उंबरेत सदस्य पदाचे लिलाव करा ; प्रत्येक मतदाराला मिळतील इतके रुपये..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरेत सदस्य पदाचे लिलाव करा ; प्रत्येक मतदाराला मिळतील इतके रुपये..!

उंबरे : वेबटीम      उंबरे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आल्याने अनेक जण लंगोट लावून तयार झाले आहेत, पण मला असं वाटतं की, गावात निवडणूक झाली तर...

उंबरे : वेबटीम   


 

उंबरे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आल्याने अनेक जण लंगोट लावून तयार झाले आहेत, पण मला असं वाटतं की, गावात निवडणूक झाली तर कोरोना वाढू शकतो, शिवाय निवडणूक म्हणाल तर दारू गोळ्याचा खर्च आलाच,त्यापेक्षा सदस्य पदाचा 5 लाख आणि सरपंच पदाचा 10 लाखाला लिलाव करावा, आणि हे पैसे विकास कामाला किंवा त्या वार्डातील मतदारांना समान देऊन ग्रामपंचायत बिनविरोध करावी, अशी संकल्पना युवानेते कैलास खंडांगळे यांनी मांडली आहे
.

ते म्हणाले, आपलं गाव पैसेवाले आहे, त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक वॉर्डात 10 लाखाचा चुराडा होणार आहे, शिवाय दारू, पार्ट्याचा खर्च वेगळाच, आणि कोरोना वाढण्याची भीती पण कायम राहील, त्यापेक्षा ज्याला सदस्य व्हायचं त्याने 5 लाख द्यावे आणि ज्याला सरपंच व्हायच त्याने 10 लाख द्यावे, आशा प्रकारे आपले सदस्य 15 आहेत, म्हणजे 75 लाख सदस्यांचे होतील, शिवाय 10 लाख सरपंचाचे वेगळे आशा प्रकारे 85 लाख होतील, गावात एकूण मतदार सरासरी 5 हजार आहेत,  म्हणजेच 1 एका मतदाराला 1700 रुपये आशा प्रकारे जोडीला 3400 रुपये थेट लाभ देता येईल, त्यातून गाव सुरक्षित राहील, वाद होणार नाहीत, इतर खर्च वाचेल, 
  सदस्यांना निवडणुकीत घरोघरीं प्रचाराला फिरावे लागेल, त्यातून मतदाराला आणि उमेदवाराला नाहक कोरोनाचा धोका, थंडीचे वातावरण आहे, त्यातून आजारी पडायची शक्यता आहेच, मतदारांना पण मतं द्यायला यावे लागेल, त्यातून पुन्हा गर्दी, नाहक कामही हुकेल, पोलीस, महसूल कर्मचाऱ्याना नाहक वैताग, निवडणुकात चांगले पोरं पण दारू पेतेंन, म्हणजे घरच्यांना आणि बाहेरच्यांना त्रास, त्यामुळे निवडणुकीच्या लफडयात पडण्यापेक्षा स्वतः घरी रहा, आणि जे घरी आहेत, त्यांना घरपोहच पैसे पाठवा व निवडणूक बिनविरोध करून टाका, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत