उंबरे ः वेबटीम उंबरेत बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वच गटाचे नेते अनुकुल असले तरी, यात कदाचित यश आले नाही. तर गावात ‘काँटे की टक्कर’ होण्याच...
उंबरे ः वेबटीम.
उंबरेत बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वच गटाचे नेते अनुकुल असले तरी, यात कदाचित यश आले नाही. तर गावात ‘काँटे की टक्कर’ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाने पाचही प्रभागात जोरदार व्यूहरचना करून आघाडी घेतली असून, विरोधी गटातूनही तुल्यबळ उमेदवाराची शोधमोहिम सुरू असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे
उंबरे गावचे नेते तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, साहेबराव दुशिंग, सुनिल अडसुरे, नवनाथ ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग, राजेंद्र ढोकणे, प्रा.रामकृष्ण ढोकणे, कैलास अडसुरे, कारभारी ढोकणे, यांनी बिनविरोधची तयारी दर्शवली आहे. मात्र कदाचित निवडणुका घ्याव्या लागल्या तरीही कुठं मागे रहायला नको, या विचारातून पाचही प्रभागात या दोन्ही गटांतील नेत्यांनी आपले उमेदवार फायनल करून त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार नामदेवराव ढोकणे व सुनिल आडसुरे यांनी मजबूत बांधणी करून ठेवली आहे. तर साहेबराव दुशिंग यांनीही समोरचे उमेदवार पाहून तेथे तुल्यबळ उमेदवार दिले आहेत. यात छत्रपती प्रतिष्ठाणलाही तीन जागांची ऑफर दिली असून, याबाबत मात्र छत्रपती प्रतिष्ठाणने आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. याशिवाय माजी संचालक नवनाथ ढोकणे, ज्येष्ठ नेते गंग़ाधर दादा ढोकणे, प्रा. रामकृष्ण ढोकणे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे विरोधी गटात अजुनही काहीशी शांतताच आहे.
दरम्यान, शिवसेनेकडुनही कैलास आडसुरे यांच्या नेतृत्वात स्वबळाची चाचपणी सुरू असून, त्यांच्याकडुनही तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे समजते. याशिवाय संतोष बबन ढोकणे यांचाही स्वतंत्र पॅनल करण्याचा मानस असल्याचे कानावर आले आहे. त्यामुळे उंबरेत बहुरंगी लढती रंगणार असल्याचे चित्र असुन यातून काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत