संगमनेर : वेबटीम रावसाहेब रोहोकले यांचे कार्यकाळात शिक्षक बँकेत राबवलेली कुटूंब आधार योजना राज्यातील इतर बँकांना दिशादर्शक असून रोह...
संगमनेर : वेबटीम
रावसाहेब रोहोकले यांचे कार्यकाळात शिक्षक बँकेत राबवलेली कुटूंब आधार योजना राज्यातील इतर बँकांना दिशादर्शक असून रोहोकले गुरूजीं शिक्षकांचे प्रश्न सोडवण्या करिता करत असलेला पाठपुरावा निश्चित उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन मा.आ.डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाच्या संगमनेर शाखेच्या वतीने नगराध्यक्षासौ.दुर्गाताई तांबे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व श्री.भाऊसाहेब ढोकरे यांचीअहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
शिक्षक परिषदेचे राज्यसंपर्क प्रमुख श्री.रावसाहेब रोहोकले गुरुजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शिक्षणाच्या क्षेत्रातही अनेक प्रश्न आहेत.परंतु हे सर्व प्रश्न आर्थिक बाबीशी निगडीत असल्यामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती समजावून घ्यावे लागते. तरीही शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्ही निश्चितपणे यश मिळवले आहे.
यावेळी शिक्षक परिषदेचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले यांनी कोविड चा समावेश मेडिकल आजारांच्या यादीत करण्याकरिता आपण केलेल्या पाठपुराव्याबद्दल डॉ. तांबे यांचे आभार मानले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे,आर. पी. रहाणे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना सुधीर तांबे म्हणाले,शिक्षकांचे अनेक प्रश्न सध्या सरकार समोर आहेत त्या प्रश्नांची तड लावण्याचे काम आम्ही करू असे अश्वासन यावेळी त्यांनी दिले.उच्चाधिकारचे अध्यक्ष आर.पी.रहाणे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मिनाक्षी तांबे,अशोक ढगे, विकास मंडळाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ देशमुख, सचिव मच्छिंद्र कोल्हे,गणेश वाघ,परिषदेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घुले, मंडळाचे अध्यक्ष संतोष भोर, भिमराज उगलमुगले,संतोष भोर, महिला अध्यक्षा अनिता नेहे-गुंजाळ, नगरपालिका महिला अध्यक्षा पुष्पा झिंजाड, मच्छिंद्र घुले, भाऊसाहेब भागवत,सरचिटणीस संजय आंबरे, भाऊसाहेब एरंडे, नामदेवराव शेंडगे, एस. डी गायकवाड, बाळासाहेब भागवत ,सत्यवान गडगे, अशोक मधे, भाऊसाहेब काकड, अशोक शेटे, रावसाहेब शिंदे सुनील देशमुख,शिवाजी चत्तर,शिवाजी आव्हाड ,अनुराधा शिर्के,दीपाली रेपाळ, गौरी देशमुख मॅडम,शाहीन मणियार,उज्ज्वला गुंजाळ, मीनाक्षी वाकचौरे,उषा भोकनळ,चौधरी मॅडम,मीरा हासे,सुनीता हासे,रोहिणी दिघे,ज्योती गडगे, ज्योती आहेर, विजय उनवणे,बाबासाहेब शिरोळे, विक्रांत मते, संभाजी लोंढे, विश्वनाथ चौधरी, भाऊसाहेब काकड, सुनिल घुले , मच्छिंद्र ढोकरे, सुनिल फटांगरे , पोपट सोनवणे,खरात सर, शांताराम तळपे, रामदास मोरे, विलास शिरोळे, प्रभाकर काळे, अमित पन्हाळे, फुलचंद लेंडे ,सुनील दिघे, सुखदेव राजगुरू,बाबुराव कदम, भास्कर भोर, मच्छिंद्र आरोटे, रवि भालेराव, दिगंबर वाकळे, गवनाथ बोऱ्हाडे, भाऊ रंधे, भाऊसाहेब येवले, निलेश देशमुख, किरण शेळके,किरण शिरोळे,नंदू कुडेकर, गौतम गायकवाड,अरगडे राजाराम ,विक्रांत मते,हौशीराम ढोकरे,सुरेश ढोकरे,दत्तात्रय जठार,विलास खैरे,सुपेकर बी डी,रंगनाथ गारे, संपत मोरे, भाऊसाहेब खांडगे, विलास घुले, भिकाजी मोरे, संजय पांडे, लक्ष्मण भालेराव, उत्तम राऊत, भास्कर बगाड, रवींद्र पिचड, रंगनाथ गारे, लक्ष्मण कोते व सर्व रोहकले गुरुजींच्या विचारांचा पाईक असणारा खुप सारा शिक्षक समुदाय उपस्थित होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत