कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरातील साई कॉर्नर परिसरात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन वॉल जवळ घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असतान...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील साई कॉर्नर परिसरात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन वॉल जवळ घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असताना नगरपालिका पाणी पुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
सध्या कोरोना ना धुमाकूळ घातला असल्याने सर्वसामान्य जनता पूर्णहता मेटाकुटीला आलेली असतांना कोपरगाव शहरातील साई कॉर्नर परिसरातील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा पाईप लाइनचा वॉल असून या ठिकाणाहून शहरातील गांधीनगर,दत्तनगर आणि गजानन नगर या बहूसंख्य लोकवस्ती असलेल्या भागाला पाणी पुरवठा केला जातो.
वॉलच्या आसपास प्रचंड असे घाणीचे साम्राज्य पसरले असून येथील स्वछता करण्यास नगरपालिकेचे लक्ष नाही . त्यामुळे या घाणीच्या साम्राज्यमुळे डासांचे प्रमाण वाढले असून त्यातून साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच या वॉलच्या तोंडात एक सरडा प्राणी अडकलेला होता. त्यामुळे या पाण्याद्वारे विष बाधा देखील होऊन मोठी हानी होऊ शकते. अशी शक्यता शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय आंग्रे यांनी व्यक्त करत ही बाब नगरपालिकेच्या संबंधित विभागास दाखवून हा प्रश्न मार्गी लावला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत