कोपरगाव(वेबटीम ) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन ...
कोपरगाव(वेबटीम)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने तीन दिवसीय नेत्र रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन श्री हॉस्पिटल सप्तर्षीमळा येथे करण्यात आले व शिबिराच्या पहिल्याच दिवशी कोपरगावातील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद देत या तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
अतिशय अल्प दरात म्हणजेच १० रुपयात डोळ्यांची तपासणी मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येत आहे. गोर-गरीब व सर्व सामान्य नागरिकांना डोळ्यांची तपासणी करण्यासाठी जास्त पैसे खासगी दवाखान्यात मोजावे लागतात, ही बाब लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या शिबिरासाठी खूप कष्ट घेतले व नागरिकांना पर्यंत या शिबिराची माहिती पोहचवली त्यामुळेच नागरिकांचा सहभाग वाढला आणि शिबिराची सुरुवात यशस्वी रित्या झाली असे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी सांगितले.
सामाजिक कामात शिवसेना नेहमीच अग्रेसर असते व शहरप्रमुख पदी काम करत असतांना सामान्य नागरिकांच्या समस्या शिवसेनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न अविरतपणे करणार आहोत. हे शिबिर बुधवार ९ रोजी लक्ष्मीमाता मंदिर व हनुमान मंदिर, शिवनेरी चौक, सुभाषनगर येथे तर गुरुवार १० रोजी शुक्लेश्र्वर मंदिर बेट येथे घेण्यात येणार आहे तरी कोपरगाकरांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी केले. हे शिबिर अल्प दरात असून सर्व सामान्य नागरिकांनी व गरजूंना याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक सामाजिक कार्य या पुढे करणार असल्याचे एस टी कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा संघटक अस्लम शेख,ज्येष्ठ शिवसैनिक कुक्कुशेठ सहानी,दिलीप अरगडे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख व नगरसेविका सपनाताई मोरे, वर्षाताई शिंगाडे,महिला आघाडी शहरप्रमुख राखीताई विसपुते,युवानेते विक्रांत झावरे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,भूषण पाटणकर,प्रफुल्ल शिंगाडे,गगन हाडा,गोपाल वैरागळ,संघटक बाळासाहेब साळुंके,नितीन राऊत,विशाल झावरे,विभाग प्रमुख रफिक शेख,जयेश हस्वाल,विजय शिंदे,मयूर दळवी,रामदास शिंदे,निशांत झावरे,शिव व्यापारी सेनेचे योगेश मोरे, मयुर खरनार,शिववाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,शहरप्रमुख जाफर सय्यद,उपशहरप्रमुख राकेश वाघ,प्रवीण शेलार, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे,सतीश शिंगाणे,प्रवीण देशमुख,चेतन सोमवंशी,विजय सोनवणे,भूषण वडांगळे,दिपक दळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत