सायकलवारी सर्वासाठी प्रेरणादायी- अँड.पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सायकलवारी सर्वासाठी प्रेरणादायी- अँड.पोळ

  कोपरगाव(वेबटीम) आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच सामाजिक संदेश देणारी सायकल वारी सर्वासाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार लोक स्वराज्य आंदोलना...

 कोपरगाव(वेबटीम)

आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच सामाजिक संदेश देणारी सायकल वारी सर्वासाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी व्यक्त केले.

पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेच्या वतीने येवला ते गाणगापूर अशी सायकल वारी काढण्यात आली आहे. ५५० किमी अंतर सायकल वरून जाणार असून या सायकल वारीत अनेक सरकारी नोकर,शिक्षक, न्यायाधीश सहभागी झाले असून नुकतीच ही सायकल वारी कोपरगाव कडून नगर कडे जात असताना या सायकल वारीला लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

लोक स्वराज्य आंदोलनाच्यावतीने  गेल्या तीन महिन्यापासून आरोग्यदायी समाज हा उपक्रम राबवला जात असून या उपक्रमात अँड.नितीन पोळ हे सायकल वरून तालुक्यातील विविध गावे व त्या ठिकाणी असलेल्या धार्मिक ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत व या ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा म्हणून प्रकाश टाकत आहे.

आज पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेच्या वतीने येवला ते गाणगापूर या सायकल वारीला शुभेच्छा देताना अँड पोळ पुढे म्हणाले की, या उपक्रमात सुदृढ व निरोगी आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम प्रेरणादायी असून या उपक्रमात सुमारे पंचवीस सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले असून या वारीच्या माध्यमातून आरोग्य बरोबरच शिक्षण,शेती, सामाजिक आर्थिक प्रश्न  सांगणारे संदेश या सायकल वर लावण्यात आले आहे. ते सर्वांसाठी प्रेरणादायी असून प्रत्येकाने आपली सामाजिक व नैतिक जबाबदारीचे भान ठेवून व आपल्या आरोग्यासाठी  व्यायाम केला पाहिजे असे म्हटले आहे.

या उपक्रमात कोपरगावचे सुपुत्र व सटाणा कोर्टातील न्यायाधीश विक्रम आव्हाड, महेश नवनाथ भोरकडे, सोमनाथ पाटील,निलेश पाटील,अमित कुटे गणेश मोरे,वासुदेव साळुंके,सुनील दिघे, सतीश दिघे,किरण खोकले, सुनील कुटे,गोरख घोटेकर,नितीन कोकाटे, अरुण खोकले,वैभव मोरे, कैलास सलमुटे अँड. कोपरगाव जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील शरद गुजर आदी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत