कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगांव येथील रहिवासी श्री.अशोक दिनकर पवार व सौ. मंदा अशोक पवार यांची कन्या प्राध्यापीका वैशाली अशोक पवार (घोलप) यां...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील रहिवासी श्री.अशोक दिनकर पवार व सौ. मंदा अशोक पवार यांची कन्या प्राध्यापीका वैशाली अशोक पवार (घोलप) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वनस्पती शास्त्र विभागाची पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
पवार कुटुंब हे अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीतुन वर आलेले असुन, वडील अशोक पवार हे स्वतः अशिक्षीत असुनही आपल्या दोन मुलींना व दोन मुलांना उच्च शिक्षीत केले असुन, यात मुलगी दिपाली (B.E. M.P.M.), मुलगा धनंजय व राहुल हे (B.E. Mech.) असुन, पवार यांच्या परिवाराला तात्याबाबा महाराज गोंदेगांव व प.पु. राघवेश्वर नंदगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद लाभले आहे.
प्रा.वैशाली पवार यांचे प्राथमिक शिक्षण हे कोपरगांव येथील सेवा निकेतन शाळेत, उच्च माध्यमिक शिक्षण एस.एस.जी.एम. महाविद्यालयात, बी.एस.सी. बायोटेक विद्या प्रतिष्ठाण बारामती तर एम.एस.सी. बायोटेक पुणे येथील गरवारे कॉलेज येथुन पुर्ण झाले. त्यानंतर प्रवरा शैक्षणिकसंस्था, लोणी येथे २ वर्षे बायोटेक्नॉलॉजी या विभागात प्राध्यापक म्हणुन काम केले तर आता पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात बॉटनी या विभागात प्राध्यापीका म्हणुन कार्यरत असून, त्यांना पी.एच.डी. या अभ्यासक्रमासाठी सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर लावरे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे परशराम साबळे, आण्णासाहेब उंड, प्रा. गणेश शेटे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. वैशाली यांच्या यशात खारीचा वाटा असलेले त्यांचे वडील, आई व संपुर्ण कुटुंबाचा खारीचा वाटा असुन, स्वतः आई वडील हे अडाणी असुनदेखील त्यांनी आपल्या मुलामुलींना उच्चशिक्षीत करुन त्यांनी जावई व सुना देखील उच्च शिक्षीत करुन आणल्या आहेत. अशा गरिबीतुन वर आलेल्या पवार परिवाराची सर्वत्र चर्चा होवुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत