कोपरगावातील रसराज मेडिकल स्टोअर्समधून चोरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावातील रसराज मेडिकल स्टोअर्समधून चोरी

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातील सावकर चौकातील रसराज मेडिकल स्टोअर्सचा रात्री दहा वाजेनंतर लाकडी दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यानी मेडिकल मधील ...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव शहरातील सावकर चौकातील रसराज मेडिकल स्टोअर्सचा रात्री दहा वाजेनंतर लाकडी दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यानी मेडिकल मधील ४२ हजार रुपये रोख व ०५ हजार रुपये कंपनीचा एअरटेल कंपनीचे सिमकार्ड असलेला लिनोव्हा कंपनीचा भ्रमणध्वनी संच असा ४७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याने शहरातील दुकानदारामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  शैलेश केशवराव साबळे (वय-३९) यांच्या मालकीचे रसराज मेडिकल स्टोअर्स नावाचे औषधी विकण्याचे दुकान आहे.त्यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद केले व ते आपल्या सुखशांतीनगर येथील घरी निघून गेले त्या नंतर रात्री कधी तरी अज्ञात चोरट्यानी पाळत ठेऊन या चौकात कोणी नाही ही बाब हेरून आपली विशेष कला दाखवली आहे व दुकानातील ५००,२००,१०० रुपये किमतीच्या नोटा असा ४२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे शिवाय तेथे असलेला एअर टेल कंपनीचे सिमकार्ड असलेला लिनोव्हा कंपनीचा भ्रमणध्वनी फरार केला आहे असा एकुण चोरट्यानी ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने मेडिकल स्टोअर्सचे मालक शैलेश साबळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध  गु.र.क्रं.८५६/२०२० भा. द.वि.कलम ४५७,३८०,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी भेट दिली असून पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री पवार हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत