कोपरगाव(वेबटीम) शहरातील अनेक प्रभागातील सार्वजनिक शौचालये,स्वच्छता गृहे (मुताऱ्या) यांची तोडफोड होत असल्याचे आढळून येत आहे.यातील काही शौच...
कोपरगाव(वेबटीम)
शहरातील अनेक प्रभागातील सार्वजनिक शौचालये,स्वच्छता गृहे (मुताऱ्या) यांची तोडफोड होत असल्याचे आढळून येत आहे.यातील काही शौचालयाचे दरवाजे,भांडी,लाईट,नळ यांचे नुकसान काही चुकीच्या प्रवृत्तीची लोक करत असल्याचा घटना समोर येत असून अनेकदा या शौचालय व मुताऱ्याची दुरुस्ती करूनही वारंवार असे प्रकार घडत आहेत. यात दारूच्या बाटल्या, विटकरीचे तुकडे,प्लास्टिक, घुटक्याच्या पुड्या टाकल्याने गटारी तुंबत आहे. त्यामूळे त्यातील पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली जाते. शहराची स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी,पदाधिकारी सातत्याने प्रयत्न करत असतात. तरीही असे गैरप्रकार घडत आहेत. या नालायक प्रवृत्तीच्या लोकांन वर आळा बसविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. नगरपालिका नागरिकांसाठी महत्वाचा सुविधा उपलब्ध करत आहे परंतु असे तोडफोडीचे प्रकार घडणे योग्य नाही.
शहरातील अनेक प्रभागात स्त्री व पुरुषांच्या सोयीसाठी स्वच्छता गृहे उभारण्याचा नगरपालिकेचा विचार आहेत परंतु त्यासाठी जागा मिळत नाहीत. कारण स्वच्छता गृह हवे पण आमच्या जवळ-समोर-शेजारी नको असे अनेक नागरिकांचे म्हणणे त्यामुळे या नागरिकांनी आपली मानसिकता बदलून नगरपालिकेस सहकार्य करावे असे आव्हान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.
तसेच शहर आपले आहे संपुर्ण शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्वांनी जबाबदारीने सहकार्य करणे आवश्यक आहे. घंटागाड्या प्रत्येक प्रभागात शहरभर फिरतात परंतु मोजके नागरिक कचरा उघड्यावर टाकून शहराची स्वछता आणि धोक्यात आणू पाहत आहे यात सुधारणा होणे गरजेचे असून नागरिकांनी ओला व सुका कचरा हा घटगाडीत वेगवेगळा करूनच टाकावा अशी विनंती कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत