देवळाली प्रवरात दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी )                 शहरातील मातंग वस्ती भागातील घरकुल योजनेच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून गँभीर जखमी झालेल्या आस्था अम...

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी )

                शहरातील मातंग वस्ती भागातील घरकुल योजनेच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून गँभीर जखमी झालेल्या आस्था अमोल वैरागर( वय ४ वर्षे) या लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


    देवळाली प्रवरा येथील मातंग वस्ती येथील  संपत सरोदे यांच्या घरी पाथर्डी येथून पाहुणी म्हणून आलेली आस्था ही ४ वर्षाची चिमुकली  दि २४ डिसेंबर रोजी  घरकुल योजनेच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत असताना अचानक तोल गेल्याने कडयावरुन खाली पडली.खालचा भाग सिमेंट क्राँक्रटीकरण असल्याने तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे.तिला तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दि.२९ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. काल दि.३० डिसेंबर रोजी आस्था हिच्यावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.

           दरम्यान देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी घरकुले बांधण्यात आले असून या घरकुलांचे कठडे व जिन्याच्या खिडक्या तुडलेल्या अवस्थेत असुन लहान मुलांच्या बाबत पुन्हा अशीच घटना घडू शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिकेने घरकुल योजनेतील खिडक्या व तुटलेले कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत