कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव नगरपालिकेला येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सन २०१८ रोजी गतिरोधकांवर पांढरे रंगाचे पट्टे टाकण्याची मागणी केली असता त...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव नगरपालिकेला येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सन २०१८ रोजी गतिरोधकांवर पांढरे रंगाचे पट्टे टाकण्याची मागणी केली असता त्यावर तब्बल दोन वर्षांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी उत्तर दिल्याने पालिकेचा भोंगळा कारभार उघड झाला आहे.
कापड बाजार परिसरातील सामाजिक कार्यकर्ते किशोर काळे यांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी कोपरगाव शहरातील रस्त्यावर असलेल्या गतिरोधकांवर अपघात टाळण्याकरिता पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावे अशी मागणी केली होती.त्या मागणीवर नगरपालिकेने योग्य तो खुलासा मागणी करणाऱ्यास तातडीने करणे आवश्यक असताना तब्बल २ वर्षाने अर्थात ३ डिसेंबर २०२० रोजी पत्र पाठवून सदरच्या गतिरोधकांवर प्रकिया पूर्ण करून पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात येईल असे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे.
मागणी केव्हा व उत्तर केव्हा मिळते हा खूप मोठा चर्चेचा विषय बनला आहे. नगरपालिकेच्या या ढिलल्या कारभाराचे चित्र या गोष्टीवरून समोर आले आहे. पत्राला उत्तर लवकर मिळत नाही मग विकास कामे केव्हा होतील असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत