अहमदनगर(वेबटीम) ग्रामीण भागातील डॉक्टर युवकांनी पुढे येत अँप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारून रुग्णांची सेवा करण्याचा घेतलेला वसा हा वाख...
अहमदनगर(वेबटीम)
ग्रामीण भागातील डॉक्टर युवकांनी पुढे येत अँप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारून रुग्णांची सेवा करण्याचा घेतलेला वसा हा वाखाडण्याजोगा असल्याचे प्रतिपादन देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी केले.
अहमदनगर एमआयडीसी येथे देवळाली प्रवरा येथील डॉ.सागर गडाख, सोनई येथील डॉ.शुभम गडाख व डॉ.अतिष केदारी यांनी सुरू केलेल्या अँप्पल हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा रविवारी शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते पार पडला.प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार यशवंतराव गडाख, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.संग्राम जगताप, आ.निलेश लंके, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, यशवंत प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत गडाख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, राजेंद्र फाळके,शरदराव गडाख, सुरेश वाबळे, अमृत धुमाळ, निर्मला मालपाणी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना शरदचंद्र पवार म्हणाले की, कोरोना काळात अनेक हॉस्पिटल निर्माण झाले.काहींनी केवळ धंदा मांडला तर काहींनी प्रामाणिकपणे सेवा केली. हीच सेवा डॉ.सागर गडाख व सहकारी यांनी कोरोना काळात केल्याने मी आज अँप्पल हॉस्पिटलच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहिल्याचे शरद पवार यांनी आवर्जुन सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत