देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या वाढदिवसानिमित्त एकलव्य क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित भव्य...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या वाढदिवसानिमित्त एकलव्य क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित भव्य प्लॅस्टिक बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धेस आज दिनांक २६ जानेवारी २०२१ पासून प्रारंभ होणार आहे.
देवळाली प्रवरा येथील सोसायटी डिझेल पंपासमोरील मैदानात दिवस- रात्र हे क्रिकेटचे सामने रंगणार असून आज सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन संपन्न होणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास ३३,३३३, द्वितीय विजेत्या संघास २२,२२२, तृतीय विजेत्या संघास ११,१११ तर चतूर्थ विजेत्या संघास ७७७७ आदींसह अनेक बक्षिसे दिली जाणार आहे.
तरी इच्छुक संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा तसेच क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन एकलव्य क्रिकेट क्लब यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत