राहूरी(वेबटीम) छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराज उत्सव ठिकठिकाणी सुरू झाला असताना राहूरी शहरातील एका विवाहात दिनांक १५ फेब्रुवारी रोजी...
राहूरी(वेबटीम)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराज उत्सव ठिकठिकाणी सुरू झाला असताना राहूरी शहरातील एका विवाहात दिनांक १५ फेब्रुवारी रोजी वरराजा व वधूराणीने बोहल्यावर चढण्याअगोदर छत्रपती शिवरायांचे पूजन करून आरती केली.
राहूरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे रोहिदास खिळे(बोधेगाव, ता.शेवगाव, ह.मु.कल्याण) यांचे चिरंजीव गौरव व अमित रुईकर(यवतमाळ)यांची कन्या जागृती यांचा विवाह सोमवारी थाटामाटात पार पडला. यावेळी वर गौरव व वधू जागृती यांनी बोहल्यावर चढण्याअगोदर लग्न हॉलमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांची आरती संपन्न केली. या उपक्रमाचे सर्वानी कौतुक करत छत्रपती शिवरायांचा जयघोष केला.
आनंद तरंग वाद्यवृंदच्या कलाकारांनी पोवाडा गायन सादरिकरण केल्याने वातावरण शिवमय झाले होते. या विवाह सोहळ्यास कल्याण, यवतमाळ, ठाणे, बोधेगाव, श्रीरामपूर , राहुरीसह महाराष्ट्र भरातून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक , राजकिय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून वधू-वरांना आशीर्वाद दिले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत