कोपरगाव(वेबटीम) सूर्यतेज संस्था,कोपरगाव वतीने कोपरगाव फेस्टिव्हल, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सा. समर्थ टाइम्स, शिरोडे अ...
कोपरगाव(वेबटीम)
सूर्यतेज संस्था,कोपरगाव वतीने कोपरगाव फेस्टिव्हल, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सा. समर्थ टाइम्स, शिरोडे अँड सन्स यांचे सहकार्यातून शिवजयंती उत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याची माहिती संस्थापक व स्वच्छता दूत सुशांत घोडके यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार चित्र रूपाने भावी पिढीला समजावे. या हेतूने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी "जागर शिव विचारांचा उत्सव रयतेच्या राजांचा" हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेकरिता शालेय स्तरावर गट तयार करण्यात आले असून गट - अ (इ.५ वी- ६ वी),गट-ब (इ.७ वी-८वी) गट - क (इ.९वी - १० वी), खुला गट याप्रमाणे स्पर्धेकरिता गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय,तृतीय, उत्तेजनार्थ बक्षिसे काढण्यात येणार आहे. बक्षीस विजेता स्पर्धकास सन्मान पदक/चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेचे विषय गट अ (इ.५ वी- ६ वी) करिता छापील चित्र देण्यात येणार आहे. गट - ब (इ.७ वी ते ८ वी) करिता महाराष्ट्रातील गड किल्ले, वृक्षारोपण आणि संवर्धन, पृथ्वी वाचवा-जीवन वाचवा, प्रदूषण मुक्त वसुंधरा,शिवकालीन लोककला असे विषय देण्यात आले आहे.गट- क (इ. ९ वी १० वी) करिता जपा ऐतिहासिक स्थळे/ संवर्धन करा. मर्दानी खेळ काळाची गरज (लाठी-काठी/तलवारबाजी...),छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणा, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान (पृथ्वी,वायू,जल, अग्नी,आकाश यांच्या संवर्धनासाठी) गट ड खुला गट यांचे करिता चित्राचे विषय - छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग, माझे वसुंदरा अभियान (पृथ्वी,वायू, जल, अग्नी, आकाश यांच्या संवर्धनासाठी) याप्रमाणे विषय ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम व अटी :- प्रत्येक स्पर्धकाला फक्त कागद आयोजकांकडून देण्यात येईल. स्पर्धकास मुख्याध्यापक/ कला शिक्षक यांनी दिलेला कागदावरच चित्र रेखाटून रंगवावे.चित्रकला स्पर्धा कोपरगांव शहरातील सर्व व ग्रामिण मधील समितीने निवडलेल्या शाळांमध्ये स्पर्धा होईल.स्पर्धा नियुक्त शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी निवडलेल्या स्पर्धक सहभागी स्पर्धकांसाठी असून गुरुवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी शालेय वेळेत दोन तासाचा अवधी देऊन स्पर्धा घेण्यात येईल.तसेच खुल्या गटातील स्पर्धकांनी आपली नावे श्री.अनिल अमृतकर सर - ९८२३९८५१०३,श्री.अतुल कोताडे सर - ९८२३२३४२४२,प्रा.प्राजक्ता राजेभोसले यांचे सह स्पर्धासमितीकडे नोंदवावी. खुल्या गटातील स्पर्धा गुरुवार दि.१८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११:०० ते ०१:०० या वेळेत एस.जी.विद्यालय, कोपरगाव येथे होईल.सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेकरिता दिलेले चित्र पूर्ण रंगवलेले असावे.स्पर्धकास दिलेल्या गट निहाय विषयांपैकी एका विषयावर चित्र काढून रंगवावे.स्पर्धकास चित्र रंगविण्यासाठी कुठल्याही माध्यमांचे बंधन नाही. चित्रकला स्पर्धेतील फेरबदल, नियम, अटी, हक्क आयोजकांनी राखून ठेवले आहे. चित्राच्या पाठीमागील बाजूस स्वतःचे पूर्ण नाव, इयत्ता ,तुकडी, शाळेचे नाव व पालकांचा मोबाईल नंबर लिहावा. स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. सहभागी स्पर्धकास भारत सरकारचे आयुष मंत्रालय निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर श्री. शिवरत्न शेटे यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी स्पर्धकांनी आपल्या शाळेतील कला शिक्षकांशी संपर्क साधावा. शालेय केंद्र स्तरावर घेण्यात येणारी स्पर्धा व त्यातील सहभागी विद्यार्थ्यांचा सहभाग हा करोना प्रादुर्भाव संसर्ग टाळणे कामी आवश्यक ती सर्व उपाय योजना व काळजी घेऊन संबंधित शाळेने करावयाची आहे.चित्रकलेची आवड असणारे स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत