वळण(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच निवडनुकीमधे सरपंचपद हे ...
वळण(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच निवडनुकीमधे सरपंचपद हे कायदेशीर बाबींत अडकल्याने रीक्त राहिले असुन उपसरपंचपदी एकनाथ ज्ञानदेव खुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीमधे या ठिकाणी सरपंच पदाचा राखीव उमेदवार नसल्याने सरपंचपदासाठी एकही उमेद्वारी अर्ज दाखल न झाल्याने सरपंच पद हे रिक्त राहिले आहेत तर उपसरपंच पदासाठी एकनाथ ज्ञानदेव खुळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णायक अधिकारी बन्सी वाळके यांनी केली तर त्यांस भरत साळुंखे , ग्रामसेवक संतोष राठोड यांनी सहाय्य केले.
उपसरपंच पदासाठी खुळे यांची अशोक रामदास कुलट यांनी सुचना मांडली सदर निवडीप्रसंगी आशाबाई दत्तात्रय खुळे, शोभा रोहिदास आढाव, लिलाबाई सिताराम गोसावी, पूजा परसराम फुणगे,विमल रोहिदास रंधे, संजय भानुदास शेळके, सुरेश जालिंदर मकासरे, सुभाष रामदास ठाकर आदि सदस्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय खुळे, ज्ञानेश्वर खुळे,बी.आर. खुळे बाळासाहेब शिंदे,हरीभाऊ आढाव, नितीन आढाव,विलास आढाव,किशोर खुळे ,उमेश खिलारी,सीताराम गोसावी, रोहिदास आढाव, लक्मण खिलारी,फकिरचंद फुणगे,काशिनाथ खुळे, प्रकाश आढाव, आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या महिन्यामध्ये वळण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाने दहा जागा मिळवल्या होत्या तर परिवर्तन मंडळाला एकच जागा मिळाली होती. त्यानंतर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत वळण गावच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जातीच्या स्री जागा राखीव झाली होती.मात्र या ठिकाणी निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीच्या स्रीचे राखीव आरक्षण नसल्याने याठिकाणी पुरूषाने निवडणूक लढवली होती. त्यामुळे सरपंच पदाच्या राखीव जागेसाठी या ठिकाणी आरक्षित उमेदवार नसल्याने हे सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले आहे तर उपसरपंचपदी जनसेवा मंडळाकडुन खुळे यांची निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिका-यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत