टाकळीमिया(वेबटीम) काँग्रेसच्या मेळाव्यात आ.लहु कानडे यांनी राम मंदिर वर्गणीच्या संदर्भात केलेल्या वक्त्व्याचा आज दिनांक १० फेब्रुवारी रोज...
टाकळीमिया(वेबटीम)
काँग्रेसच्या मेळाव्यात आ.लहु कानडे यांनी राम मंदिर वर्गणीच्या संदर्भात केलेल्या वक्त्व्याचा आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी राहूरी तालुक्यातील टाकळीमिया गावात राम भक्तांच्यावतीने आ.कानडे यांचा निषेध करून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी राजेंद्र कर्पे, संदीप विधाटे, सुरेश तोडमल, शिवाजी माने, किरण शिंदे, जालिंदर निमसे, सुभाष जुंद्रे, शरद दानवे, श्री.फाटक, बाळासाहेब निमसे, गुलाब निमसे आदींसह रामभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन राहुरीचे नायब तहसीलदार गणेश तळेकर व सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री.गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत