राहूरी फॅक्टरी येथे दांडी पौर्णिमेच्या रात्री जादूटोणा! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथे दांडी पौर्णिमेच्या रात्री जादूटोणा!

राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी फॅक्टरी येथील एका सुशिक्षित कॉलनीत आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी रात्री एका घरात जादूटोणा सुरू असताना स्थानिक न...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी फॅक्टरी येथील एका सुशिक्षित कॉलनीत आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी रात्री एका घरात जादूटोणा सुरू असताना स्थानिक नागरीकांनी सतर्कता दाखवून पोलिसांना पाचारण केले असता राहूरी, चिंचविहिरे व पाथर्डी येथील मांत्रिकीमार्फत सुरू असलेला जादूटोणाचा पोलिसांनी फर्दाफाश केला आहे. याबाबत राहूरी पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‌ राहूरी फॅक्टरी ते ताहाराबाद रोडवरील एका सुशिक्षीत कॉलनीतील एका घरात नवरा व बायको आज दांडी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास म्हसनी उद, लिंबू व अन्य वस्तूंच्या साहायाने राहूरी येथील  मांत्रिक महिला, चिंचविहिरे येथील मांत्रिक पुरुष तसेच पाथर्डी येथील एक मांत्रिक महिला यांच्यामार्फत जादूटोणा करीत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले.घरातून धूर बाहेर येत असल्याचे तरुणांना दिसले. त्यानंतर राहूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी तातडीने राहूरी पोलीस ठाण्याचे श्री.मोराळे व श्री.आव्हाड दाखल झाले.जादूटोणा सूरु असलेल्या घरात पोलसांनी प्रवेश करत सर्व तपासणी केली असता त्यांना लिंबू, मिरची व इतर वस्तू आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी घरात मांत्रिकी करणाऱ्या सर्वांची विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे त्यांच्याकडून  येताच पोलिसांनी  दम भरताच  सर्व जण पोपटासारखी बोलू लागली. सर्वांची नावे व पत्ता पोलिसांनी लिहून घेऊन सर्व माहिती पोलीस निरीक्षक गाडे यांना भ्रमणध्वनीद्वारे पोलिस कॉन्स्टेबल श्री. मोराळे यांनी दिली. त्यानुसार सर्व मांत्रिकी व ज्यांच्या घरात जादूटोणा सुरू होता अशा एकूण ५ जणांना राहूरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. 

दरम्यान या घरात कायम मांत्रिकी जमा करून जादूटोणा सुरू असतो. स्थानिक नागरिकांना याचा कायम त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून पोलीस काय कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

३ टिप्पण्या

  1. आज माणूस हातात स्मार्ट फोन वापरतोय ,विज्ञानाने एवढी प्रगती केली असतांनाच.आणि स्वतः ला सूसिक्षीत सजणा~या लोकांना अशी अवदसा सूचतीच कशी ,

    अंधश्रद्धेला हे लोक खतपाणी का घालतात.

    अंधश्रद्धा बाळगणा~या लोकांच्या डोक्यात काय दगडे भरलेय का.

    या आजच्या विज्ञानयूगात लोकं अंधश्रद्धेला बळी पडतात हिच मोठी शोकांतिका आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. जे लोक अंधश्रद्धा कमी न करता अंधश्रद्धा वाढवतात असे लोक भरचौकात घेऊन पटकावले पाहीजे.

    उत्तर द्याहटवा