समता इंटरनॅशनल स्कूलची रूजल रोहमारे एकेरी रोप स्पिड होप प्रकारात द्वितीय - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समता इंटरनॅशनल स्कूलची रूजल रोहमारे एकेरी रोप स्पिड होप प्रकारात द्वितीय

  कोपरगाव प्रतिनिधी  येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगमनेर येथे आयोजित सहोद्य संगम चॅप्टर आंतरशालेय रोप स्किपींग स्पर्धेत व...

 कोपरगाव प्रतिनिधी 

येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगमनेर येथे आयोजित सहोद्य संगम चॅप्टर आंतरशालेय रोप स्किपींग स्पर्धेत विविध प्रकारातील वयोगटात पदक प्राप्त करत यावर्षीतील पहिल्या क्रिडा स्पर्धेत यश संपादन केले आहे.



          ध्रुव अकादमी संगनमेर येथे दि.09 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सहोद्य संगम चॅप्टर आंतरशालेय रोप स्किपींग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.सदर स्पर्धेत जिल्हातील अनेक शाळेनी सहभाग नोंदवला होता.यामध्ये एकोणीस वर्षातील मुली या गटात  रूजल रोहमारे हिने एकेरी रोप स्पिड होप या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला.तर याच गटात आदिती भंडारी हिने फ्री स्टाईल प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत काॅलेजचे नाव राखले.तसेच मुलांच्या विभागात याच प्रकारात अविष्कार पाटिल तर स्पिड स्प्रिंट प्रकारात देवांग भट्टड यांनी  द्वितीय क्रमांक मिळवला.स्पिड स्प्रिंट इंडूरन्स या प्रकारात जतिन दवंगे याने तृतीय क्रमांक पटकवत  आपला दबदबा कायम ठेवला.यासह एकंदरीत सांघिक कामगिरीच्या जोरावर स्पिड स्प्रिंट रीले या सांघिक प्रकारात हि द्वितीय क्रमांक पटकवत आपल्या काॅलेजचे नाव रोषण केले.यासह काॅलेजच्यावतीने स्पर्धेत सहभागी इतर स्पर्धकांनी हि आपली उत्तम कामगिरी बजावली. 


विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट शिक्षक उत्सव गांधी व रोहीत महाले सर यांचे मार्गदर्शन लाभले. समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे शाळेच्या मॅनेजींग ट्रस्टी सौ स्वाती संदीप कोयटे ,विश्वस्त श्री संदीप ओमप्रकाश कोयटे ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळेच्या शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन उपप्राचार्य श्री विलास भागडे , सर्व शिक्षकवृंद आणि इतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत