कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव येथील युवा नेत्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व्हावी अशी अपेक्षा लोक स्व...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव येथील युवा नेत्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व्हावी अशी अपेक्षा लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
आशिया खंडातील अग्रणी असलेल्या व अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातील दिग्गज घराण्यातील आ आशुतोष काळे व युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली.
जेष्ठ नेते माजी कै शंकररावजी काळे व जेष्ठ नेते माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या बरोबरच जेष्ठ नेते माजी आ अशोक काळे व बिपीन दादा कोल्हे यांनी या बँकेच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता आता युवा नेते आ आशुतोष काळे व विवेक भैय्या कोल्हे यांच्या रूपाने काळे कोल्हे यांची तिसरी पिढी या बँकेवर सत्तेवर बिनविरोध निवडून गेली आहे याचा तालुक्यातील जनतेला सार्थ अभिमान आहे.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी कागद पत्रात व जलद कर्ज पुरवठा केला जातो मात्र या शेती कर्जाची मर्यादा कमी असल्याने अनेक शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेकडे वळत आहे त्यामुळे सेवा सोसायट्या डबघाईस येताना दिसत आहे तालुक्यातील शेतीचे पाणी कमी झाल्यामुळे व जोड धंद्याची वाताहत झाल्यामुळे बेरोजगार तरुणांचे प्रमाण वाढले आहे तसेच मागील काही दिवसांपूर्वी या बँकेतील नोकर भरती वादात सापडली होती त्यातून अनेक तरुणांना नोकरीवर पाणी सोडावे लागले अशी बरीच आव्हानांचा या युवा नेत्या सामना करावा लागणार आहे.
दोन्ही युवा नेत्यावर विश्वास ठेवून अनेक तरुण जीवाचे रान करत आहेत.कोपरगाव तालुक्यात एके काळी दूध धंदा तेजीत होता हा धंदा जिल्हा बँकेच्या माध्यमातून पुन्हा नव्याने उभा करता येऊ शकतो.तेव्हा या दोन्ही युवा नेत्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करून स्वतःच्या पायावर उभे करावे अशी अपेक्षा या पत्रका तून व्यक्त केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत