राहूरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथे शुक्रवारपासून साई पारायण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथे शुक्रवारपासून साई पारायण

राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड येथे  १२ ते  १९ फेब्रुवारी...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड येथे  १२ ते  १९ फेब्रुवारी दरम्यान अण्णासाहेब चोथे मित्र मंडळाच्या श्री. साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

       राहूरी कारखाना नजीक असलेल्या चोथे वस्ती येथील  अण्णासाहेब चोथे मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान श्री साई चरित्र पारायण सोहळा संपन्न होणार असून या निमित्ताने दररोज सकाळी ७ ते १० यादरम्यान ग्रंथवाचन होणार आहे. दररोज सकाळी १० , दुपारी १२,  सायंकाळी ७ व रात्री १० वाजता श्रींची आरती केली जाणार आहे. 

    दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता ग्रंथ अवतरणिका तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व  त्यानंतर ९.३० वाजता ह.भ. प महंत उद्धव महाराज मंडलिक(नेवासे) यांचे काल्याचे जाहीर हरिकीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

 या पारायणास व्यासपीठ चालक म्हणून साई भक्त श्रीनिवास सहदेव, राहुरी हे सेवा देणार असून पारायण सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी भारत चोथे, दत्तात्रय मोरे, दीपक चोथे, अनिल थोरात, दिनेश चोथे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत