कोपरगाव प्रतिनिधी महाराष्ट्रात शेतकर्यांमध्ये आपापसात शेतजमिनीतील रस्ते,हद्दी आदी कारणावरून सातत्याने वाद वाढत चालले आहेत. सदरची प्रकरणे ...
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्रात शेतकर्यांमध्ये आपापसात शेतजमिनीतील रस्ते,हद्दी आदी कारणावरून सातत्याने वाद वाढत चालले आहेत. सदरची प्रकरणे स्थानिक तहसीलदार यांच्यासमोर मामलेदार ॲक्ट अन्वये चालू असतात याप्रकरणी तहसीलदार हे समक्ष स्थळ निरीक्षण करण्यासाठी त्या त्या गावांमध्ये भेटी देतात ,त्यावेळी स्पाॅट पंचनामा केला जातो ,तहसीलदार यांच्या निर्देशानुसार इंन कॅमेरा होत नाही,त्या ऐवजी महसूल विभागातील कर्मचारी अथवा कारकून हे त्यांना जे पाहिजे तसा व परिस्थितीचा विपर्यास करून हस्तलिखित पंचनामे तयार करतात .
कधीकधी ते वस्तुस्थितीला सोडून असतात तक्रारदारच्या तक्रारी विसंगत पंचनामे होत असल्यामुळे रस्ता केस प्रकरणी अनेक वाद वाढत चालले आहेत. यावर नामदार बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालून सदर पंचनामे हे ईन कॅमेरा करण्याचे आदेश व्हावेत .महसूल विभागाचे ह्या ज्वलंत प्रश्नावर महाराष्ट्रात काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास रस्ता केस प्रकरणी निर्णय घेण्यासाठी पारदर्शकता वाढेल व असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सदस्य व कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन राव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.यासंबंधी नितीनराव शिंदे यांनी महसूल मंत्र्यांकडे सविस्तर निवेदन दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत