देवळाली प्रवराच्या व्यापाऱ्याला १ लाख रुपयाला चुना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या व्यापाऱ्याला १ लाख रुपयाला चुना

देवळाली प्रवरा प्रतिनिधी     राहुरी कारखाना येथील शिवसेना शहर प्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक हँक करुन मिञांना 50 हजाराला गंडा घातल्याची घट...

देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

   राहुरी कारखाना येथील शिवसेना शहर प्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक हँक करुन मिञांना 50 हजाराला गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच देवळाली प्रवरा येथील व्यापाऱ्याने बँकेतील ञास टाळण्यासाठी  ऑनलाइन बँकिंग सेवा घेवून अडचण दूर करण्यासाठी फोन पेचा वापर सुरु केला.परंतू फोन पेचा पैसे आले गेल्याचा मेसेज येत नसल्याने आँन लाईन तक्रार दाखल केली असता ग्राहक सेवा केंद्रातुन बोलत असल्याचे सांगुन तुमची तक्रार निवारण करण्यासाठी सांगितलेले अँप डाऊन लोड करा. ओटीपीचा स्क्रीन शाँट पाठवा असे सांगुन फोन पे  हँक करुन काही मिनिटांच्या आत 1 लाख 1  हजार500 रुपयांना गंडा घातला आहे.

   देवळाली प्रवरा येथील एका व्यापाऱ्याला बँकेतील ञास टाळण्यासाठी  ऑनलाईन बँकिंग सेवा घेतली फोन पे द्वारे व्यवहार चालू केले.परंतू झालेल्या व्यवहाराचे मेसेज प्राप्त होत नसल्यामुळे फोन पे आँनलाईन तक्रार दाखल केली.त्यापुर्वी हँकर्स ने फोन पे हँक केलेले असल्याने आँनलाईन तक्रार केल्याचे निदर्शनास येताच हँकर्सने ग्राहकसेवा केंद्रातुन बोलत असल्याचे भासवून त्या व्यापाऱ्यास अँप डाऊनलोड करण्यास सांगितले.ग्राहकसेवा केंद्राच्या निर्देशना नुसार अँप डाऊनलोड केले.मिळालेला ओटीपी ग्राहकसेवा केंद्राबरोबर अर्थात हँकर्स बरोबर शेअर केला.काही मिनिटातच एक लाख एक हजार पाचशे रुपये व्यापाऱ्याच्या खात्यातुन काढुण घेतले.

   आँनलाईन बँकींग सुविधामध्ये  अडचण येत असताना तक्रार केली हँकर्सने त्याचा फायदा घेत बनावट ग्राहक केंद्रातुन  यानंतर सदर  व्यापाऱ्याला एका नंबरवरून फोन करुन एक अँप डाऊनलोड करण्यास सांगितले. सदर व्यापाऱ्याने अँप डाऊनलोड करताच तुम्हा ओटीपी येईल तो ओटीपीचा स्क्रीन शाँट शेअर करण्यास सांगुन.त्या व्यापाऱ्याचा मोबाइल हँकर्सच्या अनोळखी नंबरवरून फोन करणाऱ्या त्या व्यक्तींनी  कनेक्ट  करत  काही मिनिटाच्या आत 1 लाख 1हजार 500 रुपये व्यापाऱ्याच्या खात्यातून कपात झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र रक्कम गेल्यानंतर त्या व्यापाऱ्याने कपाळावर हात मारून घेत.मोठी घोडचूक केल्याने पस्तावा व्यक्त केला. आँनलाईन बँकींग व खरेदी फसवणूकीचे प्रमाणात वाढले आहे.राहुरी कारखाना येथील शिवसेना शहरप्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक हँक करुन मिञांना 50 हजाराला गंडा घातल्याची घटना ताजी असताना देवळाली प्रवरा येथील एका व्यापाऱ्यास 1 लाख 1 हजार 500 रुपयास गंडा घालण्याचा प्रकार घडल्याने सोशल मीडियाशी जोडलेल्या व  ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी धसका घेतला आहे.गुगल पे, फोन पे वापरणाऱ्या नागरीकांनी सावधानता बाळगावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत