पोलिस अधीक्षक पाटील यांनी केला पोलिस निरीक्षकाचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पोलिस अधीक्षक पाटील यांनी केला पोलिस निरीक्षकाचा सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील ओगदी गावातील एका शेतकरी कुटूंबावर मध्य रात्रीच्या वेळी  घराचा दरवाजा दगडाने  तोडुन आत प्रवेश...

कोपरगाव प्रतिनिधी

दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील ओगदी गावातील एका शेतकरी कुटूंबावर मध्य रात्रीच्या वेळी  घराचा दरवाजा दगडाने  तोडुन आत प्रवेश केला व घरात एकटी असलेल्या  महिलेला जबरी मारहाण करून घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख पैसे व साड्या ची चोरी करत दरोडेखोरांनी पोबारा केला होता,यामुळे परिसरात अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १४/२०२१ नुसार कलम ३९४,३९७,४५७,४५९ नुसार दाखल होऊन या गुन्ह्याचा तपास कोपरगाव तालुका ग्रामिणचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव हे करत होते त्यांनी अवघ्या महिनाभरातच सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला होता. 

त्यांचा या यशस्वी कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिस निरीक्षक दौलत जाधव  यांचे अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने प्रशंसीपत्र देत गौरव केला. यावेळी अधीक्षक पाटील यांनी जाधव यांचे व तालुका ग्रामिण पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतांना सांगितले की अहमदनगर पोलिस दलास आपल्या या कामगिरीबद्दल अभिमान वाटतो आपण आपल्या माध्यमातून भविष्यात देखील अशीच दैदिप्यमान कामगिरी करत राहो, आपल्या या यशाबद्दल आपणांस हार्दिक शुभेच्छा.

 यावेळी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन चे पोलिस सब इन्स्पेक्टर सचिन इंगळे, पोलीस अंमलदार इरफान शेख,अंबादास वाघ व जयदीप गवारे आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत