कोपरगाव प्रतिनिधी कोपरंगाव तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कोविड सेंटर ला भेट देत प...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरंगाव तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कोविड सेंटर ला भेट देत पाहणी केली.यावेळी त्यांचा समवेत प्रांतधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर, डॉ वैशाली बडदे हे उपस्थित होते.
यावेळी कोपरगाव येथे सुरू असलेल्या एस एस जी एम कॉलेज मधील कोविड सेंटर भेट दिली त्यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की येणाऱ्या काळात कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे असून न लावणाऱ्या कडून दंड वसूल केला जाईल तसेच दुकानदारांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांची दुकाने कोरोना नियंत्रणात येई पर्यंत सील करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.
तसेच लग्न समारंभ हा ५० लोकांच्या उपस्थित करण्याचा शासन नियम असून पोलिसांनी त्यावर लक्ष देण्याचे आदेश दिले. तसेच येथून पुढे होम कोरोनटाइन न करता आयसोलेशन कोरोनटाइन करण्यात येतील व कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २० ते ३० लोकांच्या तत्काळ चाचण्या करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. स्थानिक आठवडे बाजारात सर्वांकडून मास्क चा वापर होत असेल तर ठीक आहे नाहीतर स्थानिक प्रशासनाने आठवडे बाजार बंद करावे अशा एक ना अनेक महत्त्वाचा सूचना जिल्हाधिकारी यांनी कोपरगाव येथील स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत