देवळाली नगरपरिषदेचे भूमिगत गटार प्रकल्पास मजुरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली नगरपरिषदेचे भूमिगत गटार प्रकल्पास मजुरी

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी) देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या  भूमिगत गटार प्रकल्पास आज मंत्रालयात प्रधान सचिव महेश...

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी)

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या  भूमिगत गटार प्रकल्पास आज मंत्रालयात प्रधान सचिव महेश पाठक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती मंत्रालय मुंबई येथून भ्रमणध्वनी द्वारे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा भूमिगत गटार प्रस्ताव नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी गेल्या वर्षी दाखल केला होता, काही तांत्रिक अडचणीमुळे मागील आर्थिक वर्षात तो प्रकल्प मंजूर झाला नाही, परंतु यावर्षी सर्व त्रुटींची पूर्तता करून नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी अजित निकत यांनी मंत्रालयामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला, दोन वर्षांपासून चालू असलेल्या प्रयत्नांना आज शुक्रवार दि. १९ मार्च रोजी मंत्रालयात प्रधान सचिव महेश पाठक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित मंजुरी देण्यात आली, या योजनेचे प्रेझेंटेशन स्वतः नगराध्यक्ष सत्यजित कदम  व मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले, एकूण भूमिगत गटार प्रकल्प ७४ कोटींचा आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४४ कोटींच्या योजनेस या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे व पहिल्या टप्प्यात देवळाली प्रवरा गावठाण व राहुरी फॅक्टरी गावठाण हद्दीतील रहिवासी भागात राबविण्यात येणार असून, एकूण ७७ किलोमीटर ची गटार जमा करणारी भूमिगत गटार लाईन असेल,  सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट ५.५ एम.एल .डी.चा असून नगरपरिषदेने नव्याने खरेदी केलेल्या जागेत हा प्लांट बसविण्यात येणार आहे हि योजना वाढती लोकसंख्या व निवासी घरांचा विचार करता सन २०५१ पर्यंत कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही असा दृष्टिकोन ठेवून हि योजना राबविण्यात येणार आहे असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी भ्रमणदवाणी द्वारे सांगितले.


 अनेक प्रलंबित कामांना मंजुरी

 👉देवळाली प्रवरा शहर भूमिगत गटार योजना

👉राहुरी कारखाना स्मशानभूमी विकसित करण्याच्या कामास मंजुरी 

👉मातंग वस्ती स्मशानभूमी विकसित करण्याच्या कामास मंजुरी

👉बाजारतळ येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स दुसऱ्या मजला बांधण्याच्या कामास मंजुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत