कोपरगाव(वेबटीम) कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली टु प्लस( दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले)...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली टु प्लस( दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले) यादीतील 23 आरोपी,दुय्यम पोलीस अधिकारी,पोलीस पाटील,बिट अंमलदार यांचा मेळावा घेण्यात आला.मेळाव्या दरम्यान टु प्लस यादीतील गुन्हेगारांचे सर्व ऍ़गलने फोटो घेण्यात आले आहेत तसेच सदर गुन्हेगारांना त्यांचेवर दाखल असणारे गुन्हयाची त्यांना जाणीव करुन देण्यात आली.
सदर गुन्हयामुळे त्यांना समाजात जिवन जगताना अपमानीत झाल्यासारखे वाटत असेल पुन्हा चांगले जिवन जगण्यासाठी गुन्हयाची पार्श्वभुमीतुन बाजुला कसे निघता येईल त्या बाबत काय करायला पाहिजे याची माहीती देवुन गुन्हेगारांना सुधारण्यासाठी योग्य ते समुपदेशन केले असुन चांगल्या कामासाठी पोलीस नेहमीच तुमच्या मदतीसाठी तयार राहतील याची त्यांना जाणीव करुन दिली व गुन्हेगारांचे वर्तनात सुधारणा होणे करीता तसेच भविष्यात त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळु नये या करीता त्यांचे मनपरिवर्तन होणे करीता त्यांना योग्य ते समुपदेशन पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यानी केले. सोबतच कायदयाचया चाकोरीत राहूनच जिवन जगणयाचा सल्ला हजर पो.नि वासुदेव देसले यांनी आरोपिंना दिला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत