चिंचविहिरे येथील सचिन शिंदे व कुटुंबाला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे येथील सचिन शिंदे व कुटुंबाला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात सचिन दत्तू शिंदे या तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी रा...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात सचिन दत्तू शिंदे या तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सचिन दत्तू शिंदे या तरुणाने राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की,  दि २७ मार्च रोजी माझा चुलत भाऊ संदीप शिंदे यांच्या दूध डेअरिवर वसंत रावसाहेब कवाणे हा तेथे आला असता त्यांच्यात वाद होऊन ते आपापसात मिटले होते. परंतु त्याचा राग मनात धरून वसंत रावसाहेब कवाणे, नागेश रावसाहेब कवाणे, संतोष वसंत कवाणे, आज सकाळी ९.३० वाजता एकत्रित येऊन माझा चुलत भाऊ संदिप शिंदे यास शिवीगाळ करू लागले. तेव्हा मी जावून त्यांना समजून सांगत असताना त्यांना त्याचा राग आला असता वसंत कवाणे याने घराजवळ पडलेला कौलाचा तुकडा फेकून मारला.तसेच माझे वडील दत्तू शिंदे , भाऊ किरण शिंदे यांनाही नागेश कवाणे, संतोष कवाणे यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करून दुःखापत केली.

 दरम्यान राहूरी पोलीस ठाण्यात सचिन दत्तू शिंदे याने दिलेल्या फिर्यादीववरून वसंत कवाणे, नागेश कवाणे व  संतोष कवाणे यांच्या विरुद्ध ३२४,३३७,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत