'त्या' नेत्याला कामधेनूचा आताच कसा पान्हा फुटला ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'त्या' नेत्याला कामधेनूचा आताच कसा पान्हा फुटला ?

  राहुरी(वेबटीम)  जो कधी आपल्या काकांचा झाला नाही, तो लोकांचा काय होईल आणि अशा पुतणा मावशीचे प्रेम असणाऱ्यांना निवडणुका समोर दिसताच आताच काम...

 राहुरी(वेबटीम)


 जो कधी आपल्या काकांचा झाला नाही, तो लोकांचा काय होईल आणि अशा पुतणा मावशीचे प्रेम असणाऱ्यांना निवडणुका समोर दिसताच आताच कामधेनूचा पान्हा कसा फुटला ?   इत्यादी प्रशांची सरबत्ती विद्यमान सत्ताधारी मंडळाच्या एका नेत्याने केली असून, ही नौटंकी फक्त उमेदवारी मिळविण्यासाठी सुरु असल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे.

 संबंधित नेता म्हणाला की, आज ज्यांना कारखान्याचा पुळका आला आहे, त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आपल्याला देखील सभासदांनी एकदा संधी दिली होती, काय दिवे लावले आपण, हे   तालुक्याला माहिती आहे, तुम्ही तनपुरेना वेठीस धरत के केलं, पुढे तुमच्या तावडीतून 'राजे' देखील सुटले नाहीत, अशी तुमची  राजकीय कामगिरी आहे. त्यामुळे तुम्हाला कारखान्यावर बोलायचा अधिकार नाही,कारण, कारखाना तुम्ही देखील आमच्या स्टेजवर एकदा आला होता, हे विसरू नका, महत्वाचे म्हणजे आपले काका जिवंत असताना आपण कुठं होतात? घरचा भेदी लंका दहन करणारे तुम्ही, काकाला आयुष्यभर विरोध केला, काकाविरोधात तनपुरे गटात काम केलं, हे स्वतः विसरले असाल, हे जनता कशी विसरणार ?काकाच्या नावाने मंच स्थापन केला नंतर एका पक्षाच्या स्टेजवर जाऊन प्रवेश केला. 

आता तुम्हाला उमेदवारी हवी आहे, त्यामुळे तुम्ही हा अट्टहास करत असल्याचेही एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत