डॉ.तनपुरे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइनद्वारे संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.तनपुरे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइनद्वारे संपन्न

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी फॅक्टरी येथे डॉ.तनपुरे साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने  संपन्न झाली.  यावेळी खा.सुजय...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी फॅक्टरी येथे डॉ.तनपुरे साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने  संपन्न झाली.

 यावेळी खा.सुजय दादा विखे, चेअरमन नामदेवराव ढोकणे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय  ढुस, कार्यकारी संचालक बी.एन. सरोदे ,सर्व संचालक, अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते.


सुजय विखे यांच्या भाषणातील मुद्दे 


* महाराष्ट्रात मागील ३ वर्षात २५ सहकारी साखर कारखाने बंद पाडून खासगीकरण करून ताब्यात घेतले. महाराष्ट्रात कोणी असो जो पर्यंत सुजय विखे जिवंत आहे तो पर्यंत राहुरीचे खासगीकरण होऊ देणार नाही


* तनपुरे कारखान्याचे एप्रिल अखेर पर्यंत ऊस गाळप सुरू राहणार 


*ज्यांच राहूरी कारखान्याला उसाच टिपरु जात नाही,  त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार नाही.


* यंदाचे गाळपास अनेक अडचणी आल्या परंतु सभासद, संचालक , अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेतल्यामुळे २ लाख टन ऊस गाळप आजअखेर पूर्ण


* नर्सिंग होम, इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये मी कधी पाय ठेवला नाही, माझं एकच ध्येय सभासद, कामगारांचा आत्मा असलेला राहूरी कारखाना सुरळीत चालवून सर्वांना न्याय मिळावा

*जे लोक ग्रामपंचायतला निवडुन येत नाही, ज्यांना बायको चहा देत नाही ते माझ्यावर व संचालक मंडळावर  आरोप करतात.

*राज्य सरकारच्या गृहखात्याच्या 100 कोटींच्या वसुलीचा ट्रेलर आपण पहिला आहे,मात्र महसूल खात्याची चौकशी झाली तर संपूर्ण पिक्चर दिसेल, अशी टीका करून महसुलमंत्री थोरात हे जिल्ह्यातील शेतकरी दुधदर, नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असताना श्रीरामपुरात जाऊन दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन देतात, इथले शेतकरी जाऊ द्या खड्यात, पण दिल्लीत समर्थन, ही अजब गोष्ट असल्याचेही खासदार सुजय विखे यांनी बोलून दाखवले.

*प्रवेरेचे 25 कोटीं राहुरीकडून वसूल करणार, आमचा तो खर्च झाला आहे, त्यामुळे सोडणार नाही

*स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढे शांत संचालक मंडळ मला लाभले, त्यांनी मनमोकळेपणाने मला कारभार करू दिला.

*दुसऱ्याकडून सुपारी घेऊन घरं चालवणार्यानी आपल्याकडील थकबाकी अगोदर भरावी, मग प्रश्न करा, उत्तरे देऊ

ऑनलाइन  मीटिंग मध्ये सभासद बांधवानी प्रश्न विचारले त्यावर खा.सुजय विखे यांनी त्यांना उत्तरे दिली. ऑनलाइन मीटिंग मध्ये तनपुरे कारखाना संचालक मंडळ व सुजय विखे यांच्यावर टीका करणारे अमृत धुमाळही हजर होते. कोण आहेत ते, चष्मावाले कोण आहेत, मी त्यांना ओळखत नाही, बोलायच का तुम्हाला अशी विचारणा खा.विखे यांनी केली. बऱ्याच वेळ वाट ही पाहिली परंतु अमृत धुमाळ एक शब्दही बोलले नाही. त्यानंतर सुजय विखे यांचे भाषण सुरू झाले. मात्र ऑनलाईन स्क्रीनवर अमृत धुमाळ परत दिसूनही आले नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत