विराट प्रतिष्ठानच्यावतीने गंगाधर बाबा छात्रालयातील मुलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विराट प्रतिष्ठानच्यावतीने गंगाधर बाबा छात्रालयातील मुलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) ‌  विराट प्रतिष्ठानचे संस्थापक  प्रदीप भाऊ सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त राहूरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

‌  विराट प्रतिष्ठानचे संस्थापक  प्रदीप भाऊ सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त राहूरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयातील मुलांना अन्नदान व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

‌ जगभरात असलेल्या कोरोना महामारीमुळे  यंदा अतिशय साध्या पद्धतेने विराट प्रतिष्ठान चे संस्थापक प्रदीप भाऊ सरोदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी सामाजिक अंतर ठेवून व योग्य ती काळजी घेवून वाढदिवस साजरा करण्यात आला.

‌ यावेळी विराट प्रतिष्ठानचे कोअर कमिटी अध्यक्ष  सचिन साळवे म्हणाले की, विराट प्रतिष्ठान मार्फत सामाजिक कार्य अहोरात्र सुरू असून प्रदीप सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदलित, वंचित समाजाला न्याय देण्यासाठी लढा देत आहे. 

‌यावेळी प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष विजय सरोदे , अविनाश थोरात ,राजेंद्र जगधने, तालुका उपाध्यक्ष नाना ससाणे, शहराध्यक्ष सागर उल्हारे देवळाली शहर अध्यक्ष , विठ्ठल सरोदे ,वांबोरी शहर अध्यक्ष  ईश्वर ससाणे, तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल शिंदे, गोरख सरोदे , प्रफुल्ल ओहोळ, आश्रमाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन विजय सरोदे यांनी केले तर आभार  राजेंद्र जगधने यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत