अखेर बैलबाजार रस्त्याच्या कामास सुरुवात...! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अखेर बैलबाजार रस्त्याच्या कामास सुरुवात...!

कोपरगाव/प्रतिनिधी शहरातील उपनगरांना जोडणाऱ्या बैलबाजार रस्त्याचे काम करण्याबाबतचे निवेदन पालिकेला ४ एप्रिलला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर...

कोपरगाव/प्रतिनिधी

शहरातील उपनगरांना जोडणाऱ्या बैलबाजार रस्त्याचे काम करण्याबाबतचे निवेदन पालिकेला ४ एप्रिलला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी दिले होते. अखेर पालिकेने दखल घेऊन कामास सुरुवात केल्याने शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शहरातील उपनगरांना जोडणारा बैलबाजार हा महत्वाचा रस्ता आहे. गेल्या वर्षभरापासून रस्त्याचे काम रखडलेले होते. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार पालिकेला निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला. तरी देखील दुर्लक्ष करून कामास दिरंगाई झाल्याने १ मे पर्यंत कामास सुरुवात केली गेली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता; अखेर पालिकेने दखल घेऊन कामास सुरुवात केली आहे.  याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी पाठपुरावा केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत