राहूरी(वेबटीम) राहूरी शहरातील डॉ. विक्रम खुरुद यांच्या कोविड हॉस्पिटल अनेक कोरोना रुग्णांना वरदान ठरत असून रूग्ण बरे होऊन घरी आनंदाने परत...
राहूरी(वेबटीम)
राहूरी शहरातील डॉ. विक्रम खुरुद यांच्या कोविड हॉस्पिटल अनेक कोरोना रुग्णांना वरदान ठरत असून रूग्ण बरे होऊन घरी आनंदाने परत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना रुग्णांवर योग्य व माफक दरात उपचार व्हावे यासाठी राहूरी शहरातील डॉ.विक्रम खुरुड यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना डॉ.रवी घुगरकर व सहकारी यांनी मोलाची साथ दिली.
खुरुद हॉस्पिटलमध्ये असंख्य कोरोना रूग्ण बरे होऊन घरी जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
खुरुद हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल केकडॉ. त्या पोस्टमध्ये म्हंटले की, डॉ.विक्रम खुरुद हे कोरोना रुग्णांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. त्यांनी केलेल्या योग्य आणि तातडीच्या उपचारामुळेच माझे नातेवाईक लवकर बरे झाले आहे.
विशेष म्हणजे रेमडेसिवर इंजेक्शन सुद्धा खुरुद हॉस्पिटलने योग्य किमतीत उपलब्ध करून दिले त्यासाठी संबंधित रुग्णाच्या कोणत्याही नातेवाईकाला कुठेही धावपळ करावी लागली नाही.
रुग्णाच्या सांगण्या प्रमाणे डॉ. खुरुद हे कोविड आजारातील मानक कार्यपद्धतीचा ( SOP ) चा अवलंब करून आजाराच्या सद्य स्थितीचं योग्य विश्लेषण करून रुग्णावर योग्य ते उपचार करत आहे. रुग्णावर उपचार करत असताना डॉक्टरांकडून जो काही निर्णय घेतला जातो तो प्रत्येक निर्णय डॉक्टर खुरुद यांच्या निर्णय क्षमतेची, बुद्धिमत्तेची आणि प्रदीर्घ अनुभवाची प्रचिती देतो असे म्हंटले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत