वाढत्या कोरोना मुळे आता किराणा दुकानही बंद करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाढत्या कोरोना मुळे आता किराणा दुकानही बंद करा

देवळाली प्रवरा प्रतिनिधी    खरं तर शासनाने पुकारलेला ब्रेक द चेन नावाखाली जमावबंदी,संचारबंदी हि कुचकामी ठरत आहे.या लाँकडाऊनला माझा तर विरोध ...

देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

  खरं तर शासनाने पुकारलेला ब्रेक द चेन नावाखाली जमावबंदी,संचारबंदी हि कुचकामी ठरत आहे.या लाँकडाऊनला माझा तर विरोध आहेच. परंतू अनेक किराणा व्यापारी माझी वैयक्तिक भेट घेवून किराणा मालासह अत्यावश्यक(दवाखाने, मेडीकल वगळून)  इतर सर्व  सेवा बंद ठेवण्याची मागणी काही व्यापारी करीत आहे.असे खा.सदाशिव लोखंडे यांनी गुरवारी घेतलेल्या बैठकीत खा.लोखंडे यांना नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.तर काही दिवसापुर्वीच व्यापारी संघटनेने दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी त्यासाठी मोर्चा काढला होता. दुकाने बंद व चालुचे आता राजकारण चालू झाले का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

   देवळाली प्रवरा नगर पालिकेत खा.सदाशिव लोखंडे यांनी राहुरी तालुका आढावा बैठक घेवून कोरोना संबंधित माहिती घेतली.कोविड सेंटरला येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कोविड संदर्भातील अडचणी नगराध्यक्ष  सत्यजित कदम यांनी मांडल्या.त्यावेळी चर्चा चालू असताना खा.लोखंडे यांना नगराध्यक्ष कदम यांनी ब्रेक द चेन या लाँकडाऊनला माझा पुर्णपणे विरोध असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी सांगितले की, अनेक किराणा दुकानदार माझ्याकडे आमचे दुकाने बंद ठेवण्यास सांगा अशी मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.तर दुसरीकडे व्यापारी संघटना व्यापाऱ्यांचे हातावर पोट असल्याने दुकानादारांना ठराविक वेळेत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी.या मागणीसाठी काही दिवसापुर्वीच पालिकेवर मोर्चा काढुन निवेदन दिले होते. त्यावेळीही नगराध्यक्ष कदम यांनी या लाँकडाऊनला माझा विरोध आहे.असे स्पष्ट केले होते. व्यापाऱ्यांच्या भावना शासना पर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले होते.

              व्यापारी संघटना दुकाने चालू करण्याची परवानगी मागते.तर दुसरीकडे किराणा व्यापारी नगराध्यक्ष कदम यांच्याकडे दुकाने बंद ठेवण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी काही व्यापाऱ्यांनी केल्याचे नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले.यावरुन व्यापारी संघटनेत फुट पडली का? फुट पाडण्यासाठी राजकारण शिजवले जात आहे.असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.देवळाली प्रवरात व्यापारी संघटना मजबुत झाल्याचा दावा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी करीत आहेत. आगामी राजकारणाला व्यापारी संघटना अडसर ठरु नये म्हणून आताच व्यापारी संघटनेत फुट पाडण्याचे प्रयत्न केला जात आहे का? हा संशोधनाचा विषय आहे.

               वाढता कोरोना लक्षात घेता लाँकडाऊन केला पाहिजे परंतू  तो असा नको आहे.लाँकडाऊन करायचा आहे तर संपुर्ण लाँकडाऊन करा कोणतीही व्यक्ती घराबाहेर निघला नाही पाहिजे.असे लाँकडाऊन झाले तरच कोरोना रुग्णाची साखळी तुटनार आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधणार आसल्याचे नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत