राहूरी(श्रीकांत जाधव) राहूरी तालुक्यातील संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी राहूरी कृषी विद्यापीठ येथे केली जात होती. आता मात्र आता ही चाचणी ...
राहूरी(श्रीकांत जाधव)
राहूरी तालुक्यातील संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी राहूरी कृषी विद्यापीठ येथे केली जात होती. आता मात्र आता ही चाचणी राहूरी शहरातील प्रगती विद्यालयात होणार असून तसा आदेशच तहसीलदार एफ.आर.शेख यांनी काढला आहे. शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने प्रशसनाने हा निर्णय घेतला आहे.
तहसीलदार शेख यांनी दिनांक १२ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात म्हंटले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कोविड केअर सेंटर स्थापन केलेले असून कोरोना संशयित रुग्णांची तपासणी व चाचणी केली जाते. परंतु राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करणे आवश्यक असल्याने व कृषी विद्यापीठातील चाचणी केंद्र राहूरी शहरापासून दूर असल्याने त्या प्रमाणात चाचण्या होत नसल्याचे निदर्शनास आल्याने सदर विद्यापीठातील चाचणी केंद्र बंद करून ते राहूरी शहरातील प्रगती विद्यालयात सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान अद्याप विद्यापीठातील कोविड तपासणी ठिकाणचे साहित्य व यंत्रणा राहुरीत शिफ्ट करण्यासाठी एक ते दोन दिवस लागणार असल्याने त्यानंतर राहूरी शहरातील प्रगती विद्यालयात चाचण्या सुरू होणार असल्याचे समजते.


Very good decision taken by Rahatil Tahuri which is convenient to the people.
उत्तर द्याहटवा