श्रीगोंदा : प्रतिनिधी पेडगाव येथील भिमानदी पात्रात आज दुपारी २ वाजता पोलिस जिल्हा अधिकारी यांच्या पथकांणे वाळू तस्करावर मोठी...
श्रीगोंदा : प्रतिनिधी
पेडगाव येथील भिमानदी पात्रात आज दुपारी २ वाजता पोलिस जिल्हा अधिकारी यांच्या पथकांणे वाळू तस्करावर मोठी कारवाई केल्याची माहिती समजली आहे. दरम्यान, राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल करण्यास वेळ लागू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.जिल्ह्यात सर्वच नदीपात्रात दिवसाढवळ्या वाळू उपसली जात आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी तक्रारी करत आहेत, त्यानंतर कुठं नदीपात्रात कारवाई होताना दिसते. मात्र 'झाडी' आणि 'जंगडगुत्ता' मुळे जणू कायद्या व सुव्यवस्था वाळू तस्करानी खिशात घातल्याचे दिसते. दरम्यान, पेडगाव ता.श्रीगोंदा येथील भिमानदी पात्रात आज दि.४ मे रोजी दुपारी २ वाजता पोलिस जिल्हा अधिकारी यांच्या पथकाची वाळू तस्करावर मोठी कारवाई केली, मात्र नेहमीप्रमाणे कारवाईत राजकीय हस्तक्षेप सुरू असल्याची माहिती मिळाली आहे . याशिवाय आर्थिक तडजोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र, वाळू तस्करावर गुन्हे दाखल करावेत, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी असल्याने प्रशासन कोंडीत सापडल्याची चर्चा आहे.
संग्रहित छायाचित्र


कोणत्याही टिप्पण्या नाहीत