प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने कोविड सेंटरला अन्नदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने कोविड सेंटरला अन्नदान

राहुरी : प्रतिनिधी कोविडच्या दुसऱ्या लाटेत सर्वांचे मनोबल वाढावे व रुग्णांना ईश्वरीय शक्ती मिळून सर्व रुग्ण  लवकरात लवकर बरे होउन आपआपल...


राहुरी : प्रतिनिधी


कोविडच्या दुसऱ्या लाटेत सर्वांचे मनोबल वाढावे व रुग्णांना ईश्वरीय शक्ती मिळून सर्व रुग्ण  लवकरात लवकर बरे होउन आपआपल्या घरी परिवारात सुखरूप पोहचावे या उदात्त हेतूने राहुरी येथील प्रजापिता ब्राह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कोविड सेंटर तसेच देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालय येथील  शासकीय कोविड सेंटर मधील   २१५ रुग्णांना अन्नदान करण्यात आले.


प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका नंदादीदी,सेवासाथी मोनादीदी,पुनमदीदी,खुशीदीदी,माहेशभाई,संदीपभाई गाडेकर,लीना हिरण,रत्नमाला कोरडे,संगीता हारदे,विमल प्रधान,कविता काकडे,पुष्पां गोसावी,विमल इंगळे,अलका आरोटे,जगदीश भुजाडी,सुरेखा भागवत,आशा चव्हाण,श्रद्धा काळे,मंगल शेजुळ,दांगट मॅडम,कमल भुजाडी,कामिनी रोकडे,सुरेखा ढोकणे,पोकळे दीदी,पुष्पां सिन्नरकर,बाळू वाघ आदींनी स्वतःच्या हाताने कोविड रुग्णांसाठी अन्न तयार केले.आगामी काळात राहुरी तालुक्यातील इतरही शासकीय  कोविड सेंटरला अन्नदान करण्याचा मानस विश्वविद्यालयाच्या संचालिका नंदादीदी यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत