राहुरी/प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारे भरण्याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांक...
राहुरी/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारे भरण्याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी चर्चा केलेली आहे.पाणायाची उपलब्धता आणि तांञीक बाबी बघून बंधा-यात पाणी कसे सोडता येईल यावार विचार चालु आहे.सर्व बाबी विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. शनिवारी सायंकाळी राहुरीत झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.
राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील डिग्रस मानोरी, मांजरी,वांजुळपोई हे चार कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत गेल्या काही दिवसापासून या परिसरातील नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीत बंधाऱ्यात पाणी सोडून हे बंधारे उभारण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी केली आहे.याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची देखील सकारात्मक भूमिका आहे परंतु अद्याप पाणी न न सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शनिवारी अहमदनगर जिल्हा दौ-यावर असताना त्यांनी बंधा-यात पाणी सोडण्याबाबत सकारात्मक विधान केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत