कोपरगाव/प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाची भगवान परशुराम जयंती कोपरगाव ब्राह्मण सभेतर्फे उत्सव ऑनलाईन पद्धतीने साजरी झाली. ...
कोपरगाव/प्रतिनिधी
कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाची भगवान परशुराम जयंती कोपरगाव ब्राह्मण सभेतर्फे उत्सव ऑनलाईन पद्धतीने साजरी झाली. याचबरोबर गरजूंना किराणा वाटप करून सामाजिक उत्तरदायित्व निभावले असल्याची माहिती सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी दिली. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जयंतीनिमित्त प्रारंभी ब्राह्मण सभेच्या मंगल कार्यालयात छोटेखानी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वागत सचिव सचिन महाजन यांनी केले. प्रातिनिधीक स्वरुपात उपाध्यक्ष राजेंद्र जवाद व बी.डी.कुलकर्णी यांच्या हस्ते सपत्नीक भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे पौरोहित्य वैभव जोशी यांनी केले. त्यानंतर सभेच्या विविध उपक्रमांची माहिती श्रध्दा जवाद यांनी विषद केली.
प्रास्ताविक करताना अध्यक्ष कोऱ्हाळकर म्हणाले, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन जयंती सोहळा आयोजित केला आहे. सर्व समाज बांधव कोरोनामुळे घरात बसून या सोहळ्यात सहभागी झाले. कोरोनाग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून लवकरच प्लाझ्मा दान मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर ऑनलाईन माध्यमातून ज्येष्ठ सदस्य सुधाप्पा कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई आणि बांधकाम समितीचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. शेवटी सहसचिव संदीप देशपांडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार जयेश बडवे यांनी केले. सायंकाळी ७ वाजता महिलांनी आपापल्या घरासमोर पणत्या प्रज्वलित केल्या. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजीव देशपांडे, वसंत ठोंबरे, डॉ.मिलिंद धारणगावकर, वंदना चिकटे, महेंद्र कुलकर्णी, अजिंक्य पदे, गौरीश लव्हरीकर, योगेश कुलकर्णी, सदाशिव धारणगावकर आदी पदाधिकारी व समाज बांधवांनी विशेष प्रयत्न केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत