कोपरगाव : प्रतिनिधी अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांनी संचलन केले. कोविडच्या संकटामुळे दोन्ही सण ...
कोपरगाव : प्रतिनिधी
अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांनी संचलन केले. कोविडच्या संकटामुळे दोन्ही सण घरीच साजरे करण्याचे प्रशासनाने आवाहन केले होते. त्याचा पोलिसांनी पायी जाऊन आढावा घेतला.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांसह पोलीस कर्मचारी सहभागी होते. त्यांनी शहरातील शिवाजी रोड रस्ता जामा मस्जिद आदी भागांत पायी जाऊन पाहणी केली. कोविडचे संकट अद्यापही टळलेले नसल्याने शासनाने 'ब्रेक दि चेन' धोरणांतर्गत कठोर निर्बंध लागू केलेले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनावर असल्याने त्यांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. अजूनही नागरिकांनी नियम पळून कोरोनाचा लढा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत