कोरोना पार्श्वभूमीवर नगरपालिका स्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोना पार्श्वभूमीवर नगरपालिका स्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात.

  कोपरगाव/प्रतिनिधी सद्यस्थितीत कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूंनी पाळेमुळे पसरल्याने आरोग्य विभागावर मोठा...

 कोपरगाव/प्रतिनिधी

सद्यस्थितीत कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूंनी पाळेमुळे पसरल्याने आरोग्य विभागावर मोठा ताण पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पालिका हद्दीतील बंद शाळांमध्ये सुविधांयुक्त विलगीकरण कक्ष, रॅपिड अँटिजेन टेस्ट किट आणि एचआरसीटी (स्कॅनिंग) मशीन खरेदी करण्यास परवानगी द्यावी. या मागण्यांबाबतचे निवेदन नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना नुकतेच अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही ई-मेलद्वारे पाठवले आहे.

सदर निवेदनात वर्पे यांनी म्हंटले आहे की, सध्या कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी पालिका हद्दीतील बंद असलेल्या शाळांमध्ये सोय करावी. तिथे १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यास परवानगी द्यावी. तसेच रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी किटचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. त्यासाठी पालिकांना स्वनिधीतून किट खरेदी करण्यास परवानगी मिळावी आणि एचआरसीटी (स्कॅनिंग) करणे गोरगरीब नागरिकांना परवडत नसल्याने मशीन खरेदीस विविध योजनांतर्गत परवानगी द्यावी, अशा मागण्या निवेदनातून केल्या आहेत. यातून संकटात नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा संदीप वर्पे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली. या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ.आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत