निळवंडेला निधी कमी पडू देणार नाही,२०२२ पर्यंत कालव्यांना पाणी : ना. जयंत पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निळवंडेला निधी कमी पडू देणार नाही,२०२२ पर्यंत कालव्यांना पाणी : ना. जयंत पाटील

भागडा प्रकल्पासाठी 500 कोटी हवे 

गोविंद फुणगे/राहुरी 


      निळवंडे धरणाच्या कालव्याला कामाला आपण गती दिली आहे. या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही.यावर्षी पाचशे कोटी रूपये खर्च होतील अशी आपण अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे.डिसेंबर २०२२ या वर्षात कालव्यांचे काम पुर्ण होईल आणि निळवंडे धरणातुन या कालव्यांमधुन पाणी येवून शेतक-यांचा शेतातून  वाहील आणि हा परीसर सुजलाम-सुफलाम होईल असे प्रतिपादन जलसंपदा मंञी ना.जयंत पाटील यांनी केले आहे.

            निळवंडे धरणाच्या कालव्याची पहाणी करण्यासाठी ना.जयतं पाटील यांनी आज अचानक राहुरी येथे भेट दिली. रविवारी दुपारी कानडगाव शिवारातील कालव्यांची पहाणी ना.पाटील यांनी केली असुन कामात गती येण्यासाठी अधिका-यांना देखील वेगवेगळ्या सुचना केल्या आहेत.याप्रसंगी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे माजी खासदार प्रसाद तनपुरे,पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लाभधारक क्षेञातील शेतकरी उपस्थिती होते. उपस्थित होते.   


भागडा चारीसाठी दीड कोटींची मागणी ..! आज नामदार जयंत पाटील साहेब यांना भेटून भागडा चारी देखभाल दुरुस्तीसाठी 1 कोटी 50 लाख रुपये निधीची मागणी केली असता सदर प्रस्ताव  हा  औरंगाबाद येथील गोदावरी खोरे विकास महामंडळात प्रलंबित असून संबंधित अधिकाऱ्यांना नामदार साहेबांनी प्रस्ताव लवकरात लवकर  मंत्रालयात पाठवा तातडीने निधी मंजूर करुन देण्यात येईल असे सांगितले यावेळी श्री सुयोग नालकर श्री अनिल घाडगे. श्री सोन्याबापू उर्है सर ,श्री दादासाहेब पवार श्री किशोर गागरे आदि लाभधारक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत