कोपरगांवच्या अमरधामला मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरूच - कृष्णा आढाव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगांवच्या अमरधामला मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरूच - कृष्णा आढाव

  कोपरगाव : प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सेवा प्रतिष्ठान कोपरगाव च्या वतीने तालुक्यातील जनतेला आवाहन केले होते ...

 



कोपरगाव : प्रतिनिधी


 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सेवा प्रतिष्ठान कोपरगाव च्या वतीने तालुक्यातील जनतेला आवाहन केले होते की, कोपरगाव शहरातील अमरधाम मध्ये कोरोना ने मृत्यू पावलेल्याच्या अंत्यविधीसाठी अत्यावश्यक साहित्य देणगी स्वरूपात दान करण्याची हाक दिली असता त्यास आज अखेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अजूनही मदतीचा ओघ सुरूच असल्याची माहिती जनसेवा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी दिली.




राज्यभर कोरोना रुग्ण संख्या वाढत असतांना  मृत्यूची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. कोपरगाव तालुक्यात गेल्या वर्षभरापासुन कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णाचे अंत्यसंस्कार हे तालुका प्रशासन व नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील अमरधाम मध्ये केले  जातात त्याच अनुषंगाने कोपरगांवच्या अमरधाम ला एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने अंत्यविधी साठी आवश्यक असणारे गोवऱ्या, लाकडं , मीठ, पी.पी.ई. किट   किंवा इतर अत्यावश्यक   साहित्याची मदत करण्याचे आवाहन सोशल  मीडिया, पेपर या माध्यमातून तालुक्यातील नागरीकांना केले होते त्यातूनच तालुक्यातील समस्त शेतकरी, मोल मजुरी करणारे बांधवासोबतच व्यापारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते या सोबतच आत्मा मालिक ध्यान पिठाचे संत चंद्रानंद महाराज यांनी देखील मदतीचा हात पुढे केला. या मोहिमेस तालुक्यातुन प्रचंड प्रतिसाद मिळत शेणाच्या गोवऱ्या, लाकडं, मीठ हे साहित्य मोठ्या प्रमाणात जमा झाले असता हे सर्व साहित्य  शुक्रवार दि २० मे रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या उपस्थितीत नगरपालिका प्रशासनाकडे देण्यात आले, परंतु अजून देखील मदतीचा ओघ सुरूच असून ज्या कोणाला दान देण्याची इच्छा असेल त्यांनी मनीष जाधव मो ९८२३७५२९६४, कृष्णा आढाव मो ७३५५५५११११ तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सेवा प्रतिष्ठान च्या सदस्या सोबत संपर्क साधावा असे आवाहन कृष्णा आढाव व मनिष जाधव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत