कुलसचिव वाघ यांच्या निलंबनास स्थगिती ; कुलगुरूंना चपराक ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कुलसचिव वाघ यांच्या निलंबनास स्थगिती ; कुलगुरूंना चपराक !

   राहुरी : प्रतिनिधी-               महात्मा फुले कृषीविद्यापीठांचे कुलसचिव मोहन वाघ याच्या निलंबनास स्थगिती देण्यात आली आहे .शुक्र...

 

 राहुरी : प्रतिनिधी-


             

महात्मा फुले कृषीविद्यापीठांचे कुलसचिव मोहन वाघ याच्या निलंबनास स्थगिती देण्यात आली आहे .शुक्रवारी वाघ यांनी या स्थगिती आदेश विद्यापीठांत सादर केला आहे .

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी जी पाटील यांनी गेल्या आठवड्यात कुलसचिव मोहन वाघ यांना कामात अनियमितता आढळल्याने तडकाफडकी निलंबित केले होते. त्यांचा पदभार विभागप्रमुख डॉ. महानंद माने यांच्याकडे दिला होता. या निलंबनासंदर्भात कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश वेगळा आदेश काढला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी मोहन वाघ यांचे निलंबन रद्द केले.

                 कुल सचिव मोहन वाघ यांनी कुलगुरु,महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचेकडे सादर केलेला खुलासा, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार चौकशीअंती निर्णय घेणे उचित होईल. या संदर्भात महासंचालक, कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी आठ दिवसांत चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास अहवाल सादर करावा, असे या शासन आदेशात म्हटले आहे.

          ही चौकशी पूर्ण होईपर्यंत, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (५) (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी ३ मे रोजी पारीत केलेल्या मोहन वाघ यांच्या निलंबन आदेशास स्थगिती देण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत