श्रीरामपूर : प्रतिनिधी श्रीरामपूर शहरात भरदिवसा दोन हातात दोन तलवारी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या इसमास पोलिसांनी पकडून कारवाई केली.दरम...
श्रीरामपूर : प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरात भरदिवसा दोन हातात दोन तलवारी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या इसमास पोलिसांनी पकडून कारवाई केली.दरम्यान, शाहरुख नामक इसमावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार साईनगर वॉर्ड क्रमांक 2 येथे कच्या रस्त्याने एक इसम दोन्ही हातात तलवारी घेऊन फिरत आहे. यावरून पोलिसांनी साईनगर येथे धाव घेतली असता त्यावेळी हा इसम दोन हातात दोन तलवारी घेऊन येताना मिळून आला.पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली असता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला.यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले व पंचासमक्ष त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शाहरूख अन्वर शेख असे सांगितले. त्याच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. शाहरुखवर पो कॉ मोहन पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भारतीय हत्यार कायंदा कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप, पोहेकॉ जोसेफ साळवी, किशोर जाधव, राहुल नरवडे, महेंद्र पवार, पंकज गोसावी, सुनील दिघे आदींनी केली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत