साईबाबा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास ३०० पुस्तकांची भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साईबाबा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास ३०० पुस्तकांची भेट

कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील श्री साईबाबा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास तीनशे पुस्तके भेट देऊन वाचनाविषयी असलेली सामा...

कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील श्री साईबाबा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास तीनशे पुस्तके भेट देऊन वाचनाविषयी असलेली सामाजिक बांधिलकी जोपासली.    

पुणे येथील Green Bhoomi Consultancy Private Limited कंपनीचे संचालक नितीन सोनवणे यांनी ऐतिहासिक, काव्य संग्रह, हिंदी इंग्लिश कांदबरी लहान मुलांचे बाल साहित्य अदी

 ग्रंथालयास ३०० पुस्तके भेट दिली.यावेळी पी.डी. आहेर, रविकिरण आहेर , भाऊसाहेब खरे, मेजर कैलास पाटील आदी उपस्थित होते.

गावातील वाचकांच्या ज्ञानवृद्धी, सजगता आणि सुजाण नागरिक बनण्याच्या प्रक्रियेत त्यांची भेट अमूल्य पर्वणी आहे असल्याचे वाचनालयाचे संस्थापक पी डी आहेर यांनी सांगितले. तर ग्रामीण भागात वाचनालय व ग्रंथालय सुरू करून ग्रामीण जनतेला वाचनाची आवड लावण्याचे काम आहेर यांनी केले. वाचनालयातील इतर साहित्य सोबत दररोज प्रसिद्ध होत असलेले वृत्तपत्र देखील या वाचनालयात उपलब्ध करून दिले जात असल्याने आपल्या परिसरातील घडामोडीचा अभ्यास वाचकांना येत आहे. वाचन केल्याने ज्ञान वाढते वाचनासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नसल्याने या ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ घ्यावा असे आवाहनही सोनवणे यांनी केले. शेवटी आभार रविकिरण आहेर  यांनी मानले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत