कोपरगाव-शिर्डी क्रेडाईच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव-शिर्डी क्रेडाईच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न

कोपरगाव/प्रतिनिधी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता कोपरगाव येथील लायन्स पार्कमध्ये क्रेडाईच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात न्यायाधिशां...

कोपरगाव/प्रतिनिधी

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता कोपरगाव येथील लायन्स पार्कमध्ये क्रेडाईच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात न्यायाधिशांसह १४१ नागरिकांनी रक्तदान करत राष्ट्रीय कर्तव्य निभावले. विशेषतः अतिरिक्त सत्र न्यायाधीश पराग कोदनकर यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदानासारखे दुसरे कोणतेही दान पवित्र नसल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी जिल्हा व सत्र न्या.सयाजी कोऱ्हाळे, न्या.विकास मिसाळ, न्या.रफीक शेख, मुख्य न्या.बोधनकर, प्रथम वर्ग न्या.अभिजीत डोईफोडे, तहसीलदार योगेश चंद्रे, पालिकेचे मुख्याधिकरी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, वकील संघाचे माजी अध्यक्ष ऍड. जयंत जोशी, शंतनू धोरडे, क्रेडाईचचे अध्यक्ष प्रसाद नाईक, उपाध्यक्ष विलास खोंडे, सचिव चंद्रकांत कौले, खजिनदार हिरेन पापडेजा, सिद्धेश कपिले, सदस्य राजेश टोळे, संदीप राहतेकर, राजेंद्र शिरोडे, अमोल अजमेरे, प्रदीप मुंदडा, भारती, यश लोहाडे, याकूब शेख, मनीष फुलपगार, लायन्स अध्यक्ष प्रदीप साखरे, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका पोलीस निरीक्षक दौलत जाधव, दिनार कुदळे, न्यायालय कर्मचारी, क्रेडाईचे सहकारी आदिंनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत