राहुरी/प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील नवनियुक्त उपसरपंच आशाताई वने यांनी आपल्या उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर लगेचच परिस...
राहुरी/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील नवनियुक्त उपसरपंच आशाताई वने यांनी आपल्या उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर लगेचच परिसरात वृक्षारोपण करुन आपल्या कार्यास सुरवात केली आहे.शनिवारी वने वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील आवारात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहे.
नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनानिमीत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते.तसेच वटपौर्णिमा या सुवासिनीच्या सणानिमीत्त औचित्य साधत त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.
या प्रसंगी प्रीती वने,अर्चना वने,अनिता वने,माधुरी वने,सोनाली झुगे,कविता वने,अंबिर शेख,ज्योती साळवे,जनाबाई वने,स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा तालुकाध्यक्ष आनंद वने,भारत वने,प्रकाश वने, दिनकर साळवे, राजेंद्र साळवे, महेश वने, गौरव झुगे, विजय साळवे, सागर फुलसौंदर,सुजित वने, आशिष वने, अभिजीत जाधव,संजय साळवे, सुभाष साळवे, सुभाष झुगे,फकीर शेख, असलम शेख,आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत