... अखेर कोपरगाव पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांची अमळनेरला बदली! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

... अखेर कोपरगाव पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांची अमळनेरला बदली!

  कोपरगाव/प्रतिनिधी उत्तम प्रशासक व शिस्तप्रिय अधिकारी अशी ख्याती मिळविलेले कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची अखेर अमळनेर (ज...

 कोपरगाव/प्रतिनिधी

उत्तम प्रशासक व शिस्तप्रिय अधिकारी अशी ख्याती मिळविलेले कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची अखेर अमळनेर (जि.जळगाव) पालिकेला बदली झाली आहे. याबाबत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने शुक्रवारी (ता.१८) आदेश काढले आहेत. 


अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या सहीने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची नाशिक महसुली विभागातील अमळनेर (जि.जळगाव) नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी गट ब वर्गातून अ वर्गात बदली करण्यात आली आहे. तत्पूर्वी मुख्याधिकारी सरोदे यांनी येथील राजकीय आणि कोविड संकटाला उत्तमरित्या हाताळून शहरवासियांमध्ये उत्तम प्रशासक व शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख निर्माण केली होती. 


त्यांची बदली होवू नयेच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वयंसेवी संघटना व इतर पक्षांनी देखील निवेदनातून मागणी केली होती. मात्र, शासन नियमांनुसार त्यांची अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. आता नूतन मुख्याधिकारी कोण येणार? याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत