टाकळीभान/वेबटीम:- येथील स्व. जेष्ठ पत्रकार डाॅ. मुकुंद बोडखे यांची जयंती ग्रामपंचायतच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात टाकळीभान पत्रकार सं...
टाकळीभान/वेबटीम:-
येथील स्व. जेष्ठ पत्रकार डाॅ. मुकुंद बोडखे यांची जयंती ग्रामपंचायतच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात टाकळीभान पत्रकार संघ, पत्रकार सेवा संस्था व ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली.येथील स्व. जेष्ठ पत्रकार डाॅ. मुकुंद बोडखे यांचे गेल्यावर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे त्यांच्या ३२ वर्षांच्या पत्रकारीतेतून त्यांनी गावाच्या विकासाचे आनेक प्रश्न मांडुन ते मार्गी लावले होते. त्यांच्या तळमळीने प्रश्न मांडण्याच्या शैलीमुळे त्यांचा टाकळीभानच्या विकासात मोलाचा वाटा राहीलेला आसल्याने ग्रामपंचायतचे उपसरपंच कान्हा खंडागळे व पत्रकार संघ, पत्रकार सेवा संस्था पदाधिकारी व सदस्यांनी डाॅ. बोडखे यांच्या जयंतीचे आयोजन केले होते. यावेळी अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, आबासाहेब रणनवरे, गणेश कोकणे, विलास सपकळ ,पत्रकार चंद्रकांत लांडगे, बापूसाहेब कोकणे, दिलीप लोखंडे, अशोक रणनवरे, रामेश्वर आरगडे सह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत